शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा एकरात १४० क्विंटल कांद्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST

शेतीमध्ये प्रयोग केल्यास निश्चित त्यात फायदा होतो. पारंपरिक पिकांबरोबरच काही प्रमाणात प्रयोगात्मक पीक घेतले तर उत्पन्न वाढू शकते, हे ...

शेतीमध्ये प्रयोग केल्यास निश्चित त्यात फायदा होतो. पारंपरिक पिकांबरोबरच काही प्रमाणात प्रयोगात्मक पीक घेतले तर उत्पन्न वाढू शकते, हे सय्यद समंदर यांनी दाखवून दिले आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कांदा उत्पादनाला सुरुवात केली. यावर्षी जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जमिनीची पाणीपातळीही वाढलेली आहे. त्याचा फायदा घेत सय्यद समंदर यांनी त्यांच्या सव्वा एकर शेत जमिनीत कांद्याचे पीक घेतले. पुणे फुरसंगी पंचगंगा या वाणाचा वापर करीत त्यांनी कांद्याची लागवड केली. विशेष म्हणजे, तुषार सिंचनावर कांदा लागवड करण्यात आली. त्यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. शेतात बोअर आणि विहीर असल्याने पाण्याचे नियोजन करणे शक्य झाले. चार महिन्यांमध्ये १४०क्विंटल कांद्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे ८० ते १०० क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पादन होते. मात्र योग्य नियोजन केल्यामुळे हेच उत्पादन १४० क्विंलटपर्यंत वाढविण्यात आले आहे.

इतर पिकांमध्ये एवढे उत्पन्न मिळत नाही. मात्र पीक पद्धतीत बदल करुन सय्यद समंदर यांनी कांद्याचे उत्पादन घेऊन तेवढ्याच शेत जमिनीत साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे सय्यद समंदर यांनी कांदा उत्पादनातून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

सेलूच्या बाजारात कांद्याची विक्री

पाथरा येथील सय्यद समंदर यांनी उत्पादित केलेला कांदा सेलू येथील बाजारपेठेत विक्री केला आहे. २६रुपये किलो असा दर मिळाला असून, त्यातून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पिकांवर केलेला खर्च वजा जाता या पीकातून चांगले उत्पन्न मिळाले आहे, असे सय्यद समंदर यांनी सांगितले.