फिजिकल डिस्टन्सचा बसस्थानकात फज्जा
गंगाखेड : येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन केले जात नाही. शिवाय अनेक प्रवासी मास्कचा वापरही करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. वाहकांनी वारंवार सूचना करूनही प्रवासी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
सेलू - वालूर रस्त्यावर खड्डे
वालूर : सेलू - वालूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून वाहनधारकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ किमी अंतराचा हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थ करीत आहेत. परंतु, त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.
परभणी शहरातील पथदिवे बंद
परभणी : शहरातील विविध भागातील पथदिवे गेल्या तीन दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
रस्त्यांवरील वाहनांमुळे रहदरीस अडचण
परभणी : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यासमोरच वाहने उभी राहात असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी या भागात फिरकत नसल्याने ही समस्या कायम आहे.
सुभाष भागवत
पाथरी : सुभाष रामकिशन भागवत (४८, रा. पाथरी) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पार्थिवावर माळीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष भागवत यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन बहिणी असा परिवार आहे.
उकंडी नितनवरे
बोरी : उकंडी हिरामन नितनवरे (६१, रा. बोरी) यांचे नुकतेच निधन झाले. उकंडी नितनवरे यांच्या पार्थिवावर बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.