शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

परभणी : संजय जाधव यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:45 IST

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदतीला मित्र पक्षाचे सहकारी आले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रारंभीपासूनच शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी वैयक्तिकरीत्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले होते. दिखाऊ व भपकेबाज प्रचारापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून निष्ठावान शिवसैनिकांची मदत घेतली. शिवाय त्यांच्या मदतीला मित्र पक्षाचे सहकारी आले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.सर्वसामान्य शिवसैनिक ते दोन वेळा आमदार व दुसऱ्यांदा खासदार होण्याच्या त्यांनी साधलेल्या किमयेमागे त्यांचे मजबूत पक्षीय संघटन व दांडगा जनसंपर्क कारणीभूत आहे. सामूहिक विवाह सोहळा, आरोग्य शिबीर, दहीहंडी स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या क्रीडा स्पर्धा आदींच्या माध्यमातून त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कायम राहिला. शिवाय वैयक्तिरित्या बहुतांश मतदारांशी व व्यापाऱ्यांशी थेट संपर्क राहिल्याचाही फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. त्यामुळेच त्यांना चार विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात नेहमीप्रमाणे खा.जाधव यांना २३ हजार ९५७ मतांची आघाडी मिळाली. येथे भाजपाचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, शिवसेनेचे जि.प.सदस्य राम पाटील खराबे यांनी राबविलेली प्रचारयंत्रणा स्पष्टपणे दिसून आली. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघही नेहमीप्रमाणे खा. जाधव यांच्या पाठीशी राहिला. या मतदारसंघातून खा.जाधव यांना २८ हजार ४७५ मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना व स्थानिक समीकरणेही विरोधात असल्याची चर्चा असताना खा. जाधव यांनी घेतलेले मताधिक्य चर्चेचा विषय राहिला आहे.जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी राबविलेली प्रचारयंत्रणा खा. जाधव यांच्या कामी आली असून त्यांना या मतदारसंघातून १८ हजार ७२२ मतांची आघाडी मिळाली आहे. तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते हिकमत उडाण यांनी मेहनत घेतल्याने खा.जाधव यांना २४ हजार २९२ मतांची आघाडी मिळाली आहे. ज्यामुळेच खा.जाधव यांचा विजय सुकर झाला.

टॅग्स :parabhaniपरभणीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल