शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरी भागाची लोटामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 23:58 IST

स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या वैयक्तिक शौचालयाचे शहरी भागातील उद्दिष्ट ९६ टक्के पूर्ण झाले असून, शहरांची लोटमुक्तीकडे वाटचाल झाली असली तरी ग्रामीण भागात मात्र शौचालय बांधकामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़केंद्र आणि राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे़ या अभियानांतर्गत शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे़ हगणदारीमुक्त गावे जाहीर करण्याबरोबरच सर्व नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे़ स्वच्छ भारत अभियानातील शौचालय बांधकाम हा महत्त्वपूर्ण घटक आहे़ या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले जाते़ शहरी भागात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ शहरातील सार्वजनिक हागणदारीची स्थळे निष्काशीत करण्यात आली आहेत़ त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी शौचालयांचे बांधकामही करण्यात आले आहे़ त्यामुळे शहरी भागामध्ये हे अभियान बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे़ शौचालयाच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने प्रोत्साहन अनुदान दिले जात असले तरी शौचलयाचे बांधकाम करण्यासाठी सुरुवातीच्या काळात नागरिकांमध्ये उदासिनता दिसून आली़ परंतु, दरवर्षी या संदर्भाने जनजागृती केली जात असून, त्यात आता नागरिकांची मानसिकता बदलत असल्याचे दिसत आहे़ परभणी महानगरपालिका वगळता ७ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील शौचालय बांधकामांचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच शहरांमध्ये वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांनी २०१९-२० मध्ये दिलेले वैयक्तीक शौचालय बांधकामाची उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ या आठही शहरांसाठी यावर्षी २० हजार ७५२ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी २० हजार ८४ शौचालये बांधून त्यांचा वापरही सुरू झाला आहे़ जवळपास ९४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शहरी भागाची वाटचाल लोटामुक्तीकडे होत आहे़ पाथरी नगरपालिकने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ पाथरी शहरात २ हजार ६७७ शौचालये यावर्षभरात बांधण्यात आली़ त्याचप्रमाणे गंगाखेड ३ हजार ७५, सेलू ३ हजार ३४०, मानवत ३ हजार १५५, सोनपेठ १ हजार ८८२ आणि जिंतूर नगरपालिकेने १ हजार ९४१ शौचालये यावर्षभरात बांधून पूर्ण केली असून, या सर्व शहरांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने या शहरांची वाटचाल लोटामुक्तीकडे झाली आहे़ त्यामुळे शहरी भागात शौचालय वगळून इतर सार्वजनिक स्वच्छता, घनकचºयाचे व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती या बाबीवर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे़दोनशहरांचे उद्दिष्ट अपूर्णशहरी भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामात पालम आणि पूर्णा ही दोन्ही शहरे मागे पडली आहेत़ पालम शहरात १ हजार ७४३ वैयक्तीक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले होत़े त्या तुलनेत १ हजार ३५४ शौचालयांचे आतापर्यंत बांधकाम झाले आहे़पूर्णा शहरातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे़ पूर्णा नगरपालिकेने २ हजार ८५० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते़ पालिकेने २ हजार ६६० वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण केली आहेत़या दोन्ही शहरांमध्ये शौचालय बांधकामासाठी आणखी चार महिन्यांचा कालावधी बाकी आहे़ या काळात वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करून ही शहरेही लोटामुक्तीकडे वाटचाल करू शकतात़४शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सध्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व पटवून दिले जात असून, शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.४त्याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापर सुरू केला आहे, अशा ग्रामस्थांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.अभियान : ग्रामीण भागात आव्हान४पाच वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविले जात असले तरी ग्रामीण भागात अद्यापही या संदर्भात उदासिनता दिसून येत आहे़ जिल्ह्यातील ग्रामीण भाग लोटामुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे़ यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ हजार ३८३ शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़४त्यामध्ये गंगाखेड तालुक्यात ३ हजार ५२९, जिंतूर ४ हजार ८५९, मानवत १ हजार ९९०, पालम ३ हजार ५७८, परभणी ५ हजार ४००, पाथरी १ हजार ५२१, पूर्णा ५ हजार २४१, सेलू ४ हजार २२ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १ हजार २४३ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित कण्यात आले आहे़ त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ७ हजार ५७१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़४ज्या ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम केले, अशा ५ हजार ८४७ ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या वतीने १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची गती लक्षात घेता या भागात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करून शौचालय बांधकामे वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार