शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: निवडणुकीसाठी पावणेपाचशे वाहनांचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:46 IST

विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़विधानसभा निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला आहे़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर चारही विधानसभा निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे़ उमेदवार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचाराला लागले असून, प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या पूर्व तयारीला लागले आहेत़ जिल्ह्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे़ त्यासाठी चारही मतदार संघात मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे़ जिल्ह्याच्या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुक्यापासून मतदान केंद्रापर्यंत मतदान यंत्रासह त्या केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाºयांची वाहतूक करणे, मतदान आटोपल्यानंतर मतदान यंत्र स्ट्राँग रुमपर्यंत आणून ठेवणे या कामांबरोबरच मतदान साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रशासनाला वाहनांची आवश्यकता असते़ चारही विधानसभा क्षेत्रातून अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे वाहनांची मागणी नोंदविली होती़ या मागणीवर चर्चा करून चार विधानसभा मतदार संघासाठी करार तत्त्वावर वाहने घेण्यात आली आहेत़जिंतूर विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ४५ वाहने घेण्यात आली आहे तर मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी १२ जीप आणि ३४ क्रूझरची व्यवस्था करण्यात आली आहे़ परभणी विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ३९ वाहने त्याच प्रमाणे मतदान केंद्रांसाठी ५१ जीप घेण्यात आल्या आहेत़ गंगाखेड विधानसभा मतदार संघात क्षेत्रीय अधिकाºयांसाठी ४१ वाहने तसेच मतदान केंद्रांसाठी १५ जीप आणि १० क्रूझर वाहन मालकांसमवेत करार करण्यात आला आहे़ जिंतूर पाथरी विधानसभा मतदार संघासाठी क्षेत्रीय अधिकाºयांना ३८ वाहने याशिवाय २४ क्रूझर नियुक्त करण्यात आल्या आहेत़एकूण ४९३ वाहने या निवडणुकीसाठी करार तत्त्वावर घेतली आहेत़ त्यामध्ये झोन अधिकाºयांसाठी १६३ तसेच मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचाºयांची ने-आण करण्यासाठी ७८ जीप आणि ६८ क्रूझर वाहने त्या त्या विधानसभा मतदार संघाला प्रदान करण्यात आली आहेत़१२९ बस, ३६ मिनी बसचा होणार वापर४खाजगी वाहनांबरोबरच जिल्हा प्रशासनाने राज्य परिवहन महामार्ग विभागाकडे १२९ बस आणि ३६ मिनी बसचाही करार केला असून, ही वाहने देखील निवडणूक काळात वापरली जाणार आहेत़४त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघासाठी ३७ बस, ४ मिनी बस़ परभणी ५ बस, २२ मिनी बस़ गंगाखेड ३७ बस, ८ मिनी बस आणि पाथरी विधानसभा मतदार संघासाठी ५० बस आणि २ मिनी बस वापरण्यात येणार आहेत़४तसेच ईव्हीएम मशीनसाठी १३ वाहने राखीव ठेवण्यात आली आहेत़ त्यामध्ये जिंतूर मतदार संघात ४, गंगाखेड मतदार संघात ४ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात ५ वाहनांचा समावेश आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019