शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेशनकार्ड प्रकरणांसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:21 IST

रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरण आणि गरजूंना नवीन शिधापत्रिका बदलून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती़ त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला या संदर्भात आढावा घेऊन या संदर्भातील माहिती ५ तारखेस शासनाला सादर करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी पुरवठा विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आले होते; परंतु, कोणत्याही जिल्ह्याने या संदर्भातील माहिती सादर केली नाही़ त्यामुळे या बाबतचा आढावा घेता आला नाही़ १७ फेबु्रवारी २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने या संदर्भात मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला़ त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या तरतुदीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयामार्फत पात्र नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोेकसेवा १४ आॅक्टोबर २०१५ च्या अधिसूचनेन्वये सूचित करण्यात आले आहे़ त्यामध्ये नवीन शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे इ. चा समावेश आहे़ यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे़ त्या अनुषंगाने पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, या मोहिमेत शिधापत्रिका बदलून देणे, विभक्तीकरण करणे, नवीन शिधापत्रिका देणे आदी मोहीम राबवून ३१ आॅगस्टपर्यंत या बाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार