शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : संचारबंदीमुळे रखडली मालमत्ता कराची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 00:38 IST

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा फटका महानगरपालिकेलाही बसत असून, मालमत्ता कराची वसुली मोठ्या प्रमाणात रखडली आहे़ तब्बल १९ कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असून, ती वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर उभे टाकले आहे़येथील महानगरपालिकेला कराच्या माध्यमातूनच उत्पन्न प्राप्त होते़ या उत्पन्नामधून मनपा प्रशासन चालविले जाते़ नगरपालिकेचे रुपांतर मनपात झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर अनुदान बंद झाले असून, मनपाच्या उत्पन्नातूनच विकास कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च भागविला जात आहे़ मात्र परभणी महानगरपािलकेचे उत्पन्न कमी आहे़ कर वसुली वगळता इतर कोणतेही नवीन स्त्रोत मनपाने विकसित केले नाहीत़ परिणामी करांच्या वसुलीवरच प्रशासनाला अवलंबून राहावे लागत होते़ त्यातही कर बुडविणाºयांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचाही फटका प्रशासनाला सहन करावा लागत होता़ दोन वर्षापूर्वी मनपा प्रशासनाने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले़ त्यावेळी नोंद नसलेल्या तब्बल ३० हजार मालमत्ता मनपाच्या सर्वेक्षणात आढळल्या़ त्यामुळे शहरातील मालमत्तांची संख्या ७५ हजार एवढी झाली असून, या मालमत्ता धारकांच्या कराचेही पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे़ परिणामी, मालमत्ता कराची वसुली दुप्पटीने वाढली़ त्याचा एक चांगला परिणाम मनपाच्या उत्पन्नावर झाला आहे़ मात्र मनपाकडे वसुलीचे आव्हान उभे टाकले आहे़ यावर्षी मार्च महिन्यामध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट कर्मचाºयांना दिले होते़ कर्मचारी वसुलीसाठी कामालाही लागले़ मात्र त्यातच कोरोना या विषाणूजन्य आजाराची धास्ती निर्माण झाली़ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्व यंत्रणा कामाला लागली़ देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आणि त्याचा परिणाम महापालिकेच्या वसुली मोहिमेवरही झाला़ मनपाची वसुली ठप्प पडली आहे़ नागरिक कार्यालयापर्यंत येत नसल्याने वसुली रखडली आहे़ ३१ मार्चपर्यंत महानगरपालिकेला कर वसूल करणे अपेक्षित होते़ त्यात आता आणखी दोन महिन्यांची भर पडली असून, ३१ मे पर्यंत संपूर्ण कर वसुली करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकरMuncipal Corporationनगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या