शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

परभणी : जिल्हा शाळा सिद्धीत १६ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:48 IST

शैक्षणिक व भौतिक दृष्टीकोणातून प्रत्येक शाळा समृद्ध व्हावी, या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर राहिला असून, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शैक्षणिक व भौतिक दृष्टीकोणातून प्रत्येक शाळा समृद्ध व्हावी, या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा राज्यात १६ व्या क्रमांकावर राहिला असून, मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे़बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणा केंद्रीत गुणवत्तेसाठी पुढाकार घेण्याच्या अनुषंगाने शाळा माणके व मूल्यांकन कार्यक्रम राबविण्याचा उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला़ ज्यामुळे शाळेचे एक संस्थान म्हणून मूल्यांकन करणे आणि जबाबदारीने स्वविकासाची संस्कृती विकसित करणे हा त्यामागचा उद्देश आहे़ त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांना स्वत:चे स्वमूल्यांकन करावयाचे होते़ यासाठी शालेय गुणवत्ता मूल्यांकन व प्रमाणन आराखडा आदींवर आधारित ही मूल्यांकन पद्धत विकसित करण्यात आली़ त्यानुसार परभणी जिल्ह्यात २ हजार ४१ शाळांची नोंदणी आहे़ त्यापैकी १ हजार ६८४ शाळांनी स्वयंमूल्यांकनाचे काम पूर्ण केले़ त्यामध्ये परभणी शहरातील १३१, तालुक्यातील १९४, गंगाखेड तालुक्यातील २०८, जिंतूर तालुक्यातील २७३, पाथरीतील १२४, पुर्णेतील १८८, सोनपेठमधील ११९, मानवतमधील ११०, पालममधील १६१ व सेलूतील १७६ शाळांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील १७९ शाळांची मूल्यांकनाची कामे प्रगतीपथावर आहेत़ जिल्ह्यातील १७८ शाळांनी स्वयंमूल्यांकनाचे कामच सुरू केलेले नाही़ त्यामध्ये परभणी शहारातील तब्बल ८५, जिंतूर तालुक्यातील ३४ शाळांचा समावेश आहे़ याशिवाय गंगाखेडमधील २८, परभणी ग्रामीणमधील २१ तर पूर्णा, पालममधील प्रत्येकी ४, मानवतमधील २ शाळांचा समावेश आहे़ सोनपेठ व पाथरी या दोनच तालुक्यांमध्ये या शाळांची संख्या शून्य आहे़ म्हणजेच या तालुक्यांमधील अनुक्रमे एकूण १३४ व १५३ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे़ जिल्हास्तरावर या प्रक्रियेंतर्गत सरासरी १७़४९ टक्के काम प्रलंबित असल्याचे दाखविले जात असले तरी राज्यस्तरावर शाळा सिद्धीत परभणी जिल्हा तब्बल १६ व्या क्रमांकावर राहिला आहे़मराठवाड्यातही सहाव्या क्रमांकावर परभणी आहे़ मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा पहिला (राज्यात दुसराक्रमांक), उस्मानाबाद दुसरा (राज्यात पाचवा), बीड तिसरा (राज्यात सहावा), जालना चौथा (राज्यात ११ वा), नांदेड पाचवा (राज्यात १४ वा), लातूर सातवा (राज्यात १७ वा), हिंगोली आठव्या (राज्यात २९ वा) क्रमांकावर राहिला आहे़या बाबींवर ठरविली शाळांची कामगिरी४शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी महत्त्वाचे निकष म्हणून शाळा माणके व मूल्यांकन आराखडा हा एकूण मुख्य सात क्षेत्रांचा बनविण्यात आला़ प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यातील महत्त्वाच्या घटकांना स्पर्श करणाऱ्या गाभाभूत माणकांचा समावेश करण्यात आला़ त्यामध्ये शाळेचा आवार, क्रीडा उपकरणे व साहित्यासह मैदान, वर्ग खोल्या व इतर खोल्या, विद्युत उपकरणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक, उतरता रस्ता (रॅम्प), मध्यान्न भोजन, स्वयंपाक खोली व भांडी, पेयजल, हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह, शिक्षकांना अध्ययनार्थींची जागा, शिक्षकांचे विषय व अध्यापन शास्त्रीय ज्ञान, अध्यापनाचे नियोजन, वर्ग व्यवस्थापन, आदी गाभा माणके निश्चित करण्यात आली होती़ त्या अनुषंगाने राज्यस्तरावर शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यात आले़शाळा सिद्धी उपक्रमात जिल्ह्यातील फक्त १७़४९ टक्केच कामे प्रलंबित राहिली आहेत़ लवकरच १०० टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीकोणातून शाळांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ ठरविलेल्या उद्दिष्टानुसार हा उपक्रम यशस्वी करणार आहोत़-सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाMarathwadaमराठवाडा