शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रस्त्यावर थुंकल्यास, मास्क न लावल्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 23:26 IST

परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने आता कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने आता कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपयांचा तर चेहऱ्यावर मास्क न वापरल्यासही १०० रुपयांचा दंड आकारला जाणार असून दुसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी काढला.कोरोनाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते, बाजार, रुग्णालय, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यासही १०० रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच दुकानावर फळभाजीपाला विक्रेते, सार्वजनिक जीवनाश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न ठेवल्यास (दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर) न राखल्यास किंवा विक्रेत्यांनी मार्किंग न केल्यास ग्राहकास १०० रुपये तर संबंधित दुकानदारास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. किराणा व जीवनाश्यक वस्तू विक्रेत्यांनी मुख्य वस्तुंचे दरपत्रक न लावल्यास १ हजार रुपये तर सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास २०० रुपये दंड लावण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तिक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा, औषधी घेऊन जात असल्याचे सांगून अनावश्यक फिरत असल्याचे आढळून आल्यास २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. या सहाही नियमांचे दुसºयांदा उल्लंघन केल्या फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना नियुक्त करण्यात आले आहे.४या प्रकरणी संबंधित क्षेत्रांमध्ये कारवाई करण्याची जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी