शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:49 IST

परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपोखर्णी (परभणी) : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली.श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे १०० वर्षापासूनची विजयादशमी पालखी सोहळ्याची परंपरा आहे. विजयादशमीनिमित्त श्री नृसिंह देवाची पालखी मिरवणूक निघते. यावर्षी सायंकाळी मंदिर परिसरात हरिपाठ घेण्यात आला. यावेळी गाव व परिसरातील भजनी मंडळीसह २५१ बाल भजनी मंडळे या सोहळ्यात सहभागी झाली होेती.यावेळी मंदिर परिसर भक्तीमय झाला होता. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक निघाली. टाळ, मृदंगाचा गजर, भजन, ढोलताशा वादन आणि नरहरी श्यामराज की जय, चा जयघोष करीत श्रींची पालखी मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा घालत येथे थांबली. शमी वृक्षाचे पूजन करून सोने लुटले. त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक मंदिराकडे निघाली. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वालूर येथे दसरा महोत्सववालूर- सेलू तालुक्यातील वालूर येथे ८ आॅक्टोबर रोजी दसरा उत्साहात साजरा करण्यात आला.वालूर येथे २० फूट उंचीच्या रावणाचे दहन सरपंच संजय साडेगावकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर श्री बालाजी मंदिरात महिलांनी व्यंकटेश स्तोत्र पारायण केले. रात्री बालाजी देवतेची पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली.या पालखी मिरवणुकीत वाल्मिकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व ह.भ.प. रामेश्वर महाराज कवळे, महादेव महाराज बोरगावकर यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पूर्णेत रावण दहन४पूर्णा- शहरातील राजे संभाजी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने ८ आॅक्टोबर रोजी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.४यावेळी खा. संजय जाधव, संयोजक नितीन कदम, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुधाकर खराटे, साहेब कदम, रामभाऊ रनेर, भगवान धस, संतोष एकलारे, दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, डॉ. विनय वाघमारे, डॉ. अजय ठाकूर, हिराजी भोसले, शहरप्रमुख मुंजाजी कदम, सोपान महाराज बोबडे, प्रताप कदम, श्याम कदम, अ‍ॅड. राज भालेराव, प्रमोद एकलारे, रवी जैयस्वाल, राजू धूत, गजानन हिवरे, राजू माने, बालाजी वैद्य, माणिकराव सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.४दरम्यान, शहरातील जुना मोंढा मैदानात रावण दहन पाहण्यास मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रमDasaraदसरा