शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बचतगटातील सदस्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:04 IST

शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगट असावा. नोंदणीकृत बचतगटामध्ये किमान १० सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचतगटाचे अध्यक्ष, सचिव अनुसूचित जातीचेच असावेत. सदस्यांचे जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेले असावेत. स्वयंसहाय्य बचतगटाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे व हे खाते गटाचे अध्यक्ष, सचिव यांच्या आधारकार्डशी संलग्न असावे. गटातील सदस्यांनी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अशा अटी या योजनेसाठी निश्चित केली आहे. अर्जदारांची संख्या उदिष्टापेक्षा अधिक असल्यास पात्र अर्जदारांची निवड ड्रॉ पद्धतीने केली जाणार आहे. बचतगटातील एका सदस्यास वाहन चालविण्याचा सक्षम परवाना असावा. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांना या योजनेत ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचे ट्रॅक्टर खरेदी करता येतील. मात्र योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ३.१५ लाख पेक्षा जास्त असेल तर बचतगटाने स्वत: खर्च करावा लागेल. तेव्हा या सर्व नियम अटींचे पालन करुन प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी या कार्यालयात ३१ जुलैपूर्वी सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीgovernment schemeसरकारी योजना