शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : महावंदनेस उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:48 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त ८ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. शहरातील ठिकठिकाणच्या समाजमंदिरामध्ये या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महावंदना सुकाणू समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महावंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमास पूर्णा येथील उपगुप्त महाथेरो यांच्यासह भिख्खू गणाची प्रमुख उपस्थिती होती. उपगुप्त महाथेरो यांनी धम्मदेसना दिली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महावंदना घेण्यात आली. महावंदनेच्या कार्यक्रमानंतर उपासकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दुपारपर्यंत उपासकांच्या रांगा लागल्या होत्या. महावंदना सुकाणू समितीच्या वतीने मागील सहा वर्षापासून महावंदनेचा हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हजारोंच्या संख्येने उपासक, उपासिका शुभ्रवस्त्र परिधान करुन कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या मूर्ती, धार्मिक साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होते.कार्यक्रमस्थळ परिसरात पुस्तकांची मोठ्या संख्येने विक्री४परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मंगळवारी महावंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमस्थळ परिसरात जवळपास ५ ते ६ पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते.४या स्टॉलवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, २२ प्रतिज्ञा, भारतीय राज्यघटना आदी पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदींची पुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती.४सकाळच्यावेळी महावंदनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर येथील पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांनी पुस्तके खरेदी केली.४ त्यामुळे पुस्तक विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय या परिसरात तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्याचीही खरेदी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरReligious programmeधार्मिक कार्यक्रम