शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पक्ष मान्यतेच्या शिलेदारास मंत्रीपदाची लागली आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:05 IST

शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

अभिमन्यू कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.१९७० च्या दशकापासून निवडणूक लढविणाºया शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता परभणी लोकसभा मतदारसंघाने मिळवून दिली. १९८९ मध्ये या पक्षातर्फे (त्यावेळी पक्ष मान्यता नसल्याने अपक्ष म्हणून नोंद) अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढवत तब्बल २ लाख २९ हजार ५६९ (४४.२१ टक्के) मते मिळवित विजय संपादित केला होता. त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळाली. दोनच वर्षात म्हणजेच १९९१ मध्ये पुन्हा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढविली आणि पुन्हा ते २० हजार १६१ मतांनी विजयी झाले. १९८९ पासून सुरु झालेली शिवसेनेची विजयी घोडदौड १९९८ मधील १३ महिन्यांचा कालावधी वगळता ३० वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ७ वेळा पक्षाला विजय मिळवून देत शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण क्षणांची नोंद करणाºया परभणीला आतापर्यंत पक्षाकडून काहीही मिळालेले नाही. तसा प्रयत्नही मातोश्रीकडून आतापर्यंत झालेला नाही. परिणामी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला अनेकदा विरोधकांचे उपाहासात्मक बोलणे खावे लागले. तरीही स्थानिक पदाधिकाºयांनी मातोश्रीवर चकार शब्द काढला नाही; परंतु, असे किती दिवस न मागता निमूटपणे पक्षासाठी योगदान द्यायचे, असा सवाल आता परभणीकर स्थानिक प्रतिनिधींना विचारु लागले आहेत. परभणीकर शिवसेनेला भरभरुन देतात मग शिवसेनेने परभणीकरांना आता उदात्त हेतूने भरभरुन का देऊ नये, असाही सवाल केला जात आहे.नेत्यांनी पक्ष सोडला तरी शिवसेनेचा दबदबा कायम३० वर्षाच्या कालावधीत अनेकांना पक्षामुळे सन्मानाची पदे मिळाली. त्यानंतर ही अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली; परंतु, परभणीकरांनी मात्र शिवसेनेची साथ सोडली नाही. केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो परभणी शिवसेनेचीच, हे समीकरण कायम राहिले आहे. यामध्ये नवनिर्वाचित खा.संजय जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल ४९.७७ टक्के मते मिळवित विजय संपादन केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत तब्बल १५ आजी-माजी लोकप्रतिनिधी विरोधात असताना एकाकी किल्ला लढवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज खाली उतरु दिला नाही व पक्षाला सन्मानाचा विजय मिळवून दिला. या विजयाची दखल घेऊन शिवसेनेनेही आता जाधव यांच्या रुपाने परभणीकरांना न्याय देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल