शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘त्या’ प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:34 IST

तालुक्यातील किन्ही रोड, साईनगर तांडा या ठिकाणी वनीकरण विभागाने केलेल्या वृक्ष लागवड, मातीनाला बांध या कामाच्या संदर्भात २० जुलै रोजीच्या अंकात ‘वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची मंत्रालयातून दखल घेण्यात आली असून, संबंधित कामाच्या चौकशीचे आदेश प्रादेशिक वन संरक्षकांना दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : तालुक्यातील किन्ही रोड, साईनगर तांडा या ठिकाणी वनीकरण विभागाने केलेल्या वृक्ष लागवड, मातीनाला बांध या कामाच्या संदर्भात २० जुलै रोजीच्या अंकात ‘वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची मंत्रालयातून दखल घेण्यात आली असून, संबंधित कामाच्या चौकशीचे आदेश प्रादेशिक वन संरक्षकांना दिले आहेत़जिंतूर तालुक्यातील वडाळी परिक्षेत्रांतर्गत किन्ही रोड व साईनगर तांडा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वन विभागाने हाती घेतला होता़ यावर लाखो रुपये खर्च होणार होते़ याशिवाय याच भागात वन विभागाच्या वतीने माती, नाला बांध करण्यात आले़ कामाचे कोणतेही निकष पाळण्यात आले नाहीत़ तालुक्यात प्रत्येकी ३ लाख रुपये खर्चून ९० मातीनाला बांध करण्यात आले़बांध करीत असताना काळ्या मातीचा वापर न करणे, गोल दगडांचा वापर करणे, सांडावा काढताना चुकीच्या पद्धतीने काढणे, पाणी साठवण क्षमता नसतानाही बांध बांधणे यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा खर्च वाया गेला़या सर्व प्रकरणावर २० जुलै २०१९ च्या अंकात ‘वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होती़ या अनुषंगाने महसूल व वन विभागाने औरंगाबाद येथल मुख्य वन संरक्षकांना या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़ मंत्रालयातील कार्यसन अधिकारी दामोदर दळवी यांनी ३० जुलै २०१९ रोजी या संदर्भात आदेश काढले़ संबंधित कामांची चौकशी करून अहवाल संबंधित प्रतिनिधींना देण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे़कार्यकर्त्यांना वाटली खिरापत४वन विभागाने कामे देत असताना त्या त्या गावातील राजकीय पक्षांना खिरापत वाटल्यासारखी कामे दिली़४परिणामी, निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे़ त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीforest departmentवनविभाग