शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रखर उन्हात कार्यकर्त्यांनी केला विजयाचा आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:51 IST

हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हातात भगवे ध्वज घेत गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून शिवसैनिकांनी विद्यापीठ परिसरातील केंद्रापुढे एकच गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजयाची गोड बातमी शिवसैनिकांच्या कानावर पडताच प्रखर उन्हात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकच जज्लोष करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून सुुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विद्यापीठ परिसरात गर्दी दिसून येत होती. कार्यकर्ते दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन भर उन्हात निकाली वाट पाहत होते. रस्त्यावर वाहनांची वर्दळही दिसून येत होती.सुुरुवातीच्या फेऱ्यांचे निकाल जाहीर होताच शिवसेनेला आघाडी मिळत गेल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यात उत्साह दिसून येत आहे. सकाळी १० वाजेच्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत जात असल्याने कार्यकर्ते मोकळ्या मैदानावरील झाडाखाली उभे राहून एक एक मत फेरीचे वाट पाहत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास मात्र परिसरातील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत होेते. मतफेºयांची मोजणी वाढत असताना शिवसेना कार्यकर्त्यांचा जोष वाढत होता. १७ व्या फेरीपर्यंतही शिवसेनेला मताधिक्य वाढतच गेल्याने राष्टÑवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते मात्र या भागातून काढता पाय घेत असल्याचे व अस्वस्त असल्याचे दिसून येत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळून विजयी झाल्याची बातमी कार्यकर्त्यांपर्यत पोहचल्यानंतर विद्यापीठमधील रेल्वेगेटच्या परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच खा. बंडू जाधव हे मतमोजणी केंद्रा परिसरात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहात शिगेला पोहचला.कार्यकर्त्यांनी खा. जाधव यांना गराडा घालत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भगवे रुमाल घालून गुलालाची उधळण करीत असल्याचे चित्र विद्यापीठ परिसरात दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल