शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुकान बंद ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:47 IST

सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सणासुदीचे दिवस जवळ येत असताना मनमानी पद्धतीने १ सप्टेंबरपासून रेशन दुकान बंद ठेवून संपावर जाणाºया दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना दिला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी दिला आहे़परभणीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमधील रेशन दुकानदार विविध मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे़ त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची व संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची २१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली़यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी या संदर्भात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी २० आॅगस्ट रोजी पाठविलेल्या पत्रानुसार रेशन दुकानदारांना सूचना दिल्या़ त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या ३ (१) नुसार सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यास पात्र लाभार्थी हकदार असतील, असे नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे सदरील लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित ठेवल्यास अधिनियमातील कलम २३ (१) अन्वये शास्तीची तरतूद आहे़ रास्तभाव दुकानदारांच्या संभाव्य संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणताही लाभार्थी सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळविण्यापासून वंचित राहू नये तसेच रास्तभाव दुकानदाराने अन्नधान्याची उचल न केल्यास अथवा दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदीचा भंग समजण्यात येईल तसेच रास्तभाव दुकानदारांचा परवाना रद्द करून तो बचत गटांना देण्यात येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी पगारे यांनी सांगितले़जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने शिवाय आगामी काळात सणाचे दिवस असल्याने २३ आॅगस्टपर्यंत चालान भरून रेशन दुकानदारांनी धान्य उचलावे, अन्यथा सदील दुकानदारांविरूद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ मधील नियम ५३ अन्वये तसेच या अनुषंगाने काही प्रकार घडल्यास आयपीसीमधील तरतुदी अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी सक्त सूचना यावेळी देण्यात आली़ या बैठकीस सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पल्लवी टेमकर, अव्वल कारकून विजय मोरे, लिपिक रोहित जैस्वाल, रास्तभाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप फड आदींची उपस्थिती होती़परभणी, पालमचे दुकानदार संपातून बाहेर४१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी परभणी व पालम तालुक्यातील रेशन दुकानदार या संपात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले़ राज्यातील काही भागांमधील पूर परिस्थिती, जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य स्थिती व सणासुदीचे दिवस आदी बाबींचा विचार करून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी संप करू नये, असे आवाहन यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पल्लवी टेमकर यांनी केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorजिल्हाधिकारी