शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ५० बालकांची शारीरिक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:27 IST

येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील ५० थॅलेसेमियाग्रस्त बालकांची १३ आॅक्टोबर रोजी मोफत रक्त व शारीरिक तपासणी करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील ५० थॅलेसेमियाग्रस्त बालकांची १३ आॅक्टोबर रोजी मोफत रक्त व शारीरिक तपासणी करण्यात आली़थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार असल्याने हा आजार झालेल्या बालकांना प्रत्येक १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते़ रक्त दिल्यानंतरच ही बालके जीवंत राहू शकतात़ वारंवार रक्त चढविल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते़ त्यामुळे अशा बालकांची नियमित शारीरिक तपासणी करणे गरजेचे असल्याने थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपने ४ वर्षांपासून मोफत तपासणीचा हा उपक्रम सुरू केला आहे़१३ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील थॅलेसेमिया डे केअर सेंटरमध्ये बालकांच्या रक्त तपासण्या व शारीरिक तपासण्या करण्यात आल्या़ यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ़ राजगोपाल कालानी यांनी तपासणी करण्याचे महत्त्व विशद केले़ तसेच बाळाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमित आहाराची माहिती दिली़ थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी अपंग प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती व इतर शासकीय योजनांची माहिती दिली़ या आजारातून मुक्त होण्यासाठी असलेली बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या बालकाचे पालक चंद्रशेखर पवार यांनीही मार्गदर्शन केले़जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कामी सहकार्य केले़

टॅग्स :parabhaniपरभणी