शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत ...

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळतो. त्यामुळे तामिळनाडू सरकारने नीट रद्द करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया येथील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या.

बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. या वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर एकच राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रात या परीक्षेची तयारी करून वैद्यकीय प्रवेश मिळविणाऱ्या गुणवंतांची कमी नाही. मात्र अशातच तामिळनाडू सरकारने हीच नीट परीक्षा रद्द करून बारावी परीक्षेच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी परभणीत तज्ज्ञांशी चर्चा केली तेव्हा हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांनी नोंदविले. नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. उलट बारावी परीक्षेत तेवढी पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा पद्धती योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

काय आधारे तामिळनाडू सरकारचा निर्णय

केंद्राच्या नीट परीक्षेतून तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देण्याचे विधेयक तामिळनाडू सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेची गरज नाही, तर बारावीच्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश देण्याची मुभा या विधेयकाने दिली आहे.

नीट परीक्षा ही पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थी या परीक्षेतून पुढे जातात. वैद्यकीय क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असून, त्यासाठी योग्य आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीच हवी. नीट परीक्षेच्या माध्यमातून ही पारदर्शकता पाळली जाते.

प्रा. संदीप जैस्वाल, तज्ज्ञ

नीट परीक्षेत वस्तुनिष्ठ उत्तरांना महत्त्व असते. तेथे व्यक्तिनिष्ठतेला थारा नाही. शिवाय ही परीक्षा अत्यंत पारदर्शक आहे. गुणवंत विद्यार्थीच या परीक्षेतून निवडले जातात. त्यामुळे नीट परीक्षा पद्धतीच योग्य आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक वाटतो.