शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

कोरोनाच्या संसर्गानंतर आता आरोग्याविषयी नागरिकांना अधिक जागरुक राहणे गरजेचे झाले आहे. कानांना बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा हा आजार दरवर्षीच ...

कोरोनाच्या संसर्गानंतर आता आरोग्याविषयी नागरिकांना अधिक जागरुक राहणे गरजेचे झाले आहे. कानांना बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा हा आजार दरवर्षीच पावसाळ्यात येतो. ज्यांचा कानाचा पडदा फाटला आहे, ज्यांना कानाला पूर्वीपासूनच इन्फेक्शन आहे, अशा नागरिकांमध्ये बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या नागरिकांमध्येही हा आजार उद्‌भवू शकतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ निष्काळजीपणामुळे ही बुरशी वाढू शकते. त्यामुळे कानाच्यासंदर्भाने तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट कान-नाक- घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार केल्यास कानांपासून होणारा धोका टळू शकतो.

काय घ्याल काळजी?

कान नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. विशेषत: अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर तो वारंवार निर्जंतुक करा. टोकदार वस्तूने कान स्वच्छ करू नका. कान दुखू लागल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

काडीने कान स्वच्छ करणे, कानात तेल टाकणे, असे घरगुती उपाय करू नयेत. परस्पर कोणतेही ड्रॉप्स वापरू नयेत. कानाचा पडदा नाजूक असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका

पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि आर्द्रता अधिक असते. त्यामुळे कानात बुरशी होण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर कान नीट स्वच्छ न करणे, कानात काडी घालण्याच्या प्रकारामुळे बुरशी होऊ शकते. ज्यांचे कानाचे पडदे फाटलेले आहेत, त्यांना हा धोका अधिक आहे.

कान दुखू लागल्यानंतर अनेकजण घरगुती उपचार करतात. कानात तेल टाकतात. तसेच परस्पर स्वत:हून कानाचे ड्रॉप टाकले जातात. अति ॲन्टिबायोटिक आणि स्टुरॉईडमुळे बुरशी आणि बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता असते. तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घेतले पाहिजेत.

कानात काडी घालण्याची सवय असणे, कानाचे पडदे फाटणे यामुळे कानांना बुरशी होऊ शकते. आर्द्रता वाढल्याने हा बुरशीचा आजार होतो. तसेच अनेकांना कानाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ते टाळतात. अशा रुग्णांना कानांना बुरशी आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

- डाॅ. तेजस तांबोळी