शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

२७० गावांमध्ये झाले नाही रोहयोचे एकही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे रोजगार हिरावलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामेही मिळाली नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्ह्यातील तब्बल २७० ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे रोजगार हिरावलेल्या मजुरांना रोजगार हमी योजनेची कामेही मिळाली नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळात जिल्ह्यातील तब्बल २७० ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे एकही काम झाले नाही.

मागेल त्याला काम देण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेची निर्मिती झाली. शासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मजुरांना कामे उपलब्ध करून दिली जातात. जिल्ह्यात दीड लाख ॲक्टिव्ह मजूर आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी कोरोना संसर्ग काळात शेकडो मजूर मोठ्या शहरातून गावात परतले. या मजुरांच्या कामाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे असताना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मात्र मजुरांना पुरेशी कामे उपलब्ध होऊ शकली नाहीत.

जिल्ह्यात एकूण ७०४ ग्रामपंचायती असून त्यापैकी तब्बल २७० ग्रामपंचायतींनी या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत एकही काम हाती घेतले नाही. ग्रामपंचायतींच्या मस्टरमध्ये कामांची नोंद झाली नाही. त्यामुळे २७० ग्रामपंचायतींमधील मजुरांना रोजगारासाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागली आहे. कोरोना संसर्ग काळात मदतीचा हात पुढे करण्याऐवजी ग्रामपंचायतीने कामे देण्यास टाळाटाळ केल्याने मजुरांची उपासमार वाढली आहे.

जिंतूर तालुक्यात ५२ ग्रामपंचायती

चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेचे एकही काम न करणाऱ्या गावांच्या यादीत जिंतूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील ५२ गावांनी अद्यापपर्यंत रोहयोचे काम सुरू केले नाही. त्यापाठोपाठ परभणी तालुक्यातील ४७, गंगाखेड तालुक्यातील ४२, सेलू तालुक्यातील ४१ गावांमध्ये कामे सुरू झाली नाहीत. मानवत १६, पालम २५, पाथरी २३, सोनपेठ १८ आणि पूर्णा तालुक्यातील आठ गावे अजूनही रोहयोच्या कामांसाठी पुढे आली नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींमधील मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे.

घरकुल, विहिरींची होतात कामे

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल बांधकाम, सार्वजनिक विहीर, वैयक्तिक विहीर, सार्वजनिक वृक्षलागवड, अंगणवाडी, रस्त्याचे बांधकाम आदी कामे केली जातात. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी या कामांना सुरुवात केल्यास मजुरांना रोजगार प्राप्त होतो. मागील आठवड्यात जिल्ह्यात ७४५ कामे सुरू होती. त्यापैकी ग्रामपंचायती अंतर्गत ६८७ कामांचा समावेश आहे. एकूण ९ हजार ४१४ मजुरांच्या हाताला रोहयोतून रोजगार मिळाला आहे. ग्रामपंचायतींनी हाती घेतलेल्या कामांमध्ये वैयक्तिक विहिरीची सर्वाधिक कामे आहेत.