शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेत नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

By admin | Updated: November 11, 2014 15:50 IST

मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली

हिंगोली : मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली. 
प्रत्यक्षदश्रींनी सांगितल्यानुसार, हिंगोलीतील शेख युसूफ हा दुपारी मद्यप्राशन करून पालिकेत आला. आरडाओरडा केल्यानंतर त्याला कर्मचार्‍यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थेट नगराध्यक्षाच्या दालनात शिरला. तेथे कोणीही नसल्याने त्याने दालनातील काचेचा टेबल तोडला. त्यावरील रोपट्याची कुंडीही आदळली. परिणामी, दालनात खापराचे तुकडे विखुरले तर माती खाली पडली होती. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी माहिती देताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेख यास ठाण्यात घेवून गेले. तेथे बराच काळ पोलिस तक्रारीची वाट पाहात होते. त्यात आरोपींचे नातेवाईक आले अन् त्याला परत नेले. /रात्री उशिरा तक्रार दाखल/नगराध्यक्षांची कॅबीन फोडल्याची घटना घडल्यानंतर रात्री उशिरा याबाबत तक्रार देण्यात आली. त्यात शासकीय कामात अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची फिर्याद मुख्याधिकारी येलगट्टे यांनी दिली. /(प्रतिनिधी) बैठकीनंतर तक्रार देणार डेंग्यूच्या आजाराबाबत बैठक सुरू असल्याने तक्रार देता आली नाही. बैठक आटोपताच ठाण्यात तोडफोडीविरूद्ध तक्रार देणार आहे, असे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी सांगितले. तर उशिरापर्यंत तक्रारच आली नसल्याने आरोपीला नातेवाईक घेवूनही गेले असल्याची माहिती पोनि सतीश टाक यांनी दिली.