शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रशासन विसरले आश्वासने: कर्मचारी करणार पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST

मराठवाडा नगरपरिषद व मनपा कामगार कर्मचारी युनियन लाल बावटा या संघटनेने २२ फेब्रुवारी रोजी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद ...

मराठवाडा नगरपरिषद व मनपा कामगार कर्मचारी युनियन लाल बावटा या संघटनेने २२ फेब्रुवारी रोजी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कामगारांच्या मागण्या एक महिन्याच्या आत मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते.

मनपा प्रशासनाने आश्वासन देऊन आता दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, मागण्यांबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी करण्यात आली नाही. १२ व ते २४ वर्षे कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित आहेत, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमानुसार नोकरीत कायम करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले असताना मनपा प्रशासनाने मात्र आतापर्यंत कोणतीही प्रक्रिया केली नाही. ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले, त्यापैकी दोघांना १९०० रुपयांचा ग्रेड पे देण्याचे आदेश असताना २८०० रुपयांचा ग्रेड पे देण्यात आला. त्याबाबतही काहीही कारवाई झाली नाही. शासन नियमानुसार पदोन्नती दिल्या नाहीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि ईद सणानिमित्त फेस्टिवल अद्यापपर्यंत वाटप झाले नाही. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाचा प्रशासनाला विसर पडला आहे. या आश्वासनांची येत्या आठ दिवसात अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा लाल बावटाच्या माधुरी क्षीरसागर, आवेस हाशमी, जालिंदर कांबळे आदींनी दिला आहे.