जिंतूर तालुक्यातील पोखर्णी येथील रोहिदास किशन वाकळे यांच्या आईंना त्यांचे मामा श्यामराव गोमाजी बहिरट यांनी २९ मे रोजी सकाळी हातोड्याने मारले. याबाबत सायंकाळी ५च्या सुमारास रोहिदास यांनी मामा श्यामराव बहिरट यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारला. यावेळी बहिरट यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, अंगावर धावून येऊन कोयत्याने वार केले, तसेच झटापट केली. या मारहाणीत रोहिदास वाकळे जखमी झाले. यावेळी त्यांची आई व इतरांनी येऊन सोडवासोडव केली. त्यानंतर, त्यांनी पाचेगाव येथील दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. याबाबत त्यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून रोहिदास वाकळे यांचे मामा श्यामराव बहिरट यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मामाकडून भाच्यावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST