शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावर सिमेंट व नाल्यांना खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

पाथरी : राज्यमार्ग क्र. ६१ च्या रस्त्याचे काम तालुक्यातील हादगाव बु. येथील बसस्थानक परिसरात सुरू आहे. मात्र या ठिकाणी ...

पाथरी : राज्यमार्ग क्र. ६१ च्या रस्त्याचे काम तालुक्यातील हादगाव बु. येथील बसस्थानक परिसरात सुरू आहे. मात्र या ठिकाणी वसाहती असल्याने सिमेंट रस्ता आणि दोन्ही बाजूंनी नाल्या करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागाने डांबरीकरण प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाच्या समस्या निर्माण होणार आहे.

राज्यमार्ग ६१ हा अंबड-आष्टी-पाथरी-पोखर्णी- ताडकळस-पूर्णा- नांदेड या मार्गावरून जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्यात आला होता. पाथरी तालुक्यात या रस्त्याची लांबी जवळपास ५७ किमीची आहे. सध्या तालुक्यातील हद्दीत अष्टीकडून येणाऱ्या रस्त्यावर वेगाने काम सुरू आहे. पाथरी-पोखर्णीपर्यंचे काम जवळपास पहिल्या टप्प्यात पूर्ण होत आहे. आष्टी-पाथरी रस्त्याजवळ हादगाव बु. गाव परिसरात सिमेंट रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित विभागाने डीपीआर तयार करताना या दोन्ही घटकांचा समावेश न करता डांबरीकरणाचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे हादगाव बु. ग्रामस्थांना भविष्यात दळणवळणाच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

ग्रामस्थांची सा.बां.कडे धाव

हादगाव बु.च्या गावठाण परिसरातील रस्त्यावर दोन वसाहती आहेत. या ठिकाणी सिमेंटकाँक्रीट रस्ता आणि नालीचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी सा.बां. बांधकाममंत्री अशोक चव्हाण व सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जि.प.च्या सदस्य भावनाताई नखाते व ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच हादगाव बु. ग्रामपंचायतीने ७ ऑगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन या ठिकाणी सिमेंटकाँक्रीट व नालीचे काम करण्याची मागणी केली आहे.