शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

विनाअपघात सेवा देण्यास ४६९ चालक पडले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ ...

परभणी : एस.टी. महामंडळाच्या बसची वाहतूक सुरक्षित समजली जात असली तरी परभणी विभागातील तब्बल ४६९ चालक विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता ३८१ चालक उत्कृष्ट सेवा बजावीत बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.

‘गाव तेथे एसटी’ असे बिरुद घेऊन महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाची बस वाहतूक केली जाते. प्रत्येक गावापर्यंत एस.टी.चे जाळे पसरले आहे. अतिशय सुरक्षित प्रवास म्हणून एस.टी.च्या प्रवासाकडे पाहिले जाते. मात्र, विनाअपघात सेवा देणारे चालक किती, याचा आढावा घेतला तेव्हा ४६९ चालक विनाअपघात सेवा देण्यात कमी पडल्याची बाब समोर आली. एस.टी. महामंडळाच्या परभणी विभागातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत ८५० चालक कार्यरत आहेत. वर्षभराच्या काळात एकही अपघात न करता वाहन चालविणाऱ्या चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे एक वर्षापेक्षा अधिक काळ विनाअपघात सेवा दिल्यास ६०० रुपयांचे बक्षीस दिले जाते. मागील वर्षी परभणी विभागातील ३०४ चालकांना १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले असून, ७७ चालक ६०० रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत. या चालकांनी सुरक्षित सेवा देऊन आपले कर्तव्य बजावले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला उर्वरित ४६९ चालक मात्र विनाअपघात सेवा देऊ शकले नाहीत, ही बाब समोर येते. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक आणखी सुरक्षित करण्यासाठी बस चालकांना आणखी सतर्क राहून सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात झाले ३१ अपघात

जिल्ह्यात मागील वर्षभरात ३१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये १५ किरकोळ, १२ गंभीर स्वरूपाचे आणि ४ अपघातात मृत्यू ओढावलेला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या वर्षभरात मोठा अपघात एकही झाला नाही. मात्र, दुचाकीला धडक देणे, चुकून वाहन एस.टी.च्या समोर येणे, अशा स्वरूपाचे अपघात घडले आहेत. चालकांना महामंडळाच्या वतीने तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एस.टी.चा प्रवास सुरक्षित मानला जातो.

वेगावर नियंत्रण

एस.टी. महामंडळाच्या बस क्षमतेपेक्षा अधिक वेगाने चालविल्या जाऊ नयेत. कमी अंतराच्या वाहनांना ७० कि.मी. प्रति तास, तर लांब पल्ल्यांच्या वाहनांना ८० कि.मी. प्रति तास अशी वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी असते.