याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पालम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या वडिलांनी साडेतीन वर्षांपूर्वी पालम येथील एका फायनान्स कंपनीकडून घरबांधणीसाठी १ लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे सात हप्ते भरले होते. ३ हप्ते थकले होते. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीसाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील अष्टूर येथील धोंडीबा चव्हाण नावाचा कर्मचारी येत होता. फायनान्सचे पैसे नाही भरले तर तुझ्या मुलीस पळवून नेईल, अशी धमकी तो देत असे. २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता अल्पवयीन मुलगी शेतात गेली. सायंकाळी ती परतील नाही. इतरत्र मुलीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीचा कर्मचारी धोंडीबा चव्हाण याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा संशय व्यक्त करून यासंदर्भातील फिर्याद संबंधित मुलीच्या आईने पालम पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मंगळवारी मध्यरात्री आरोपी धोंडीबा चव्हाण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस पळविले; गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST