सेलू येथील केशवराज बाबासाहेब मंदिर परिसरातील जयभवानी महिला बचत गट, कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त शहरातील सफाई कामगार, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी ग्राहक पंचायत देवगिरी प्रांतचे उपाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, कवयित्री जयश्री सोनेकर, प्रा. महेश कुलकर्णी, शंकर लाटे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, मीरा खरात आदींची उपस्थिती होती. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यावेळेस फुले कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागला, असेही अंभोरे म्हणाले. प्रास्ताविक मीरा खरात यांनी केले. तर सुनील गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी घोगरे, राजकन्या ईघवे, मीरा घोगे, सय्यद मुमताज, प्रमिला धापसे, आशा शेळके, रेणुका वाघ आदींनी प्रयत्न केले.
सावित्रीबाईंमुळेच महिला उच्चपदावर पोहोचू शकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:03 IST