शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:22 IST

परभणी : मागील काळात मतांचे विभाजन होऊन जातीयवादी शक्ती बळकट झाली व संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरू झाले. मात्र, ...

परभणी : मागील काळात मतांचे विभाजन होऊन जातीयवादी शक्ती बळकट झाली व संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरू झाले. मात्र, आगामी काळात जातीय शक्तींना मदत करणाऱ्यांना त्यांची जागा समाजाने दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

येथील माहेर मंगल कार्यालयात भीमशक्तीच्या वतीने आयोजित आदर्श मातांच्या गुणगौरव सोहळ्याच्या उद्‌घाटन प्रसंगी हंडोरे बोलत होते. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पू.भदंत मुदितानं, आ.सुरेश वरपूडकर, सुरेश नागरे, रवि सोनकांबळे, कडूबाई खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्या माउलींनी मजुरी करून आपल्या पाल्यांना आदर्श नागरिक बनविले, अशा १०० आदर्श मातांचा यावेळी साडी चोळी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रांतून चळवळीला गती देणाऱ्या २० मान्यवरांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. युवा जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांनी प्रास्ताविक केेले. प्रा.अतुल वैराट यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा उबाळे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबुराव केळकर, प्रदीप एंगडे, राहुल डुमणे, बबन वाव्हळे, तातेराव वाकळे, नदीम खान, मन्सुर पटेल, नितीन डुमणे, दीपक सावंत, अंकुश वानखेडे, राजू खरात, राहुल कनकुटे, प्रमोद कुलदीपके, चंदन मस्के, संजय साबळे, शैलेश वडमारे, सुरेश प्रधान, सिद्धार्थ भारशंकर, सागर दीपके, रोहण डुमणे आदींनी प्रयत्न केले.