परभणी : जिल्ह्यात तिन्ही मुख्य रस्त्यांच्या निर्मितीची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असून, धूळ वाढली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. गंगाखेड, जिंतूर आणि वसमत रस्त्यावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
मुद्रा कर्ज योजनेत लाभार्थ्याची फरफट
परभणी : जिल्ह्यात मुद्रा कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे बेरोजगाराऐवजी व्यावसायिकांना या योजनेतून लाखो रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणालाच बँकांकडून हारताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
बसपोर्टचे काम सुरू करा
परभणी : १३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत असे बसपोर्ट उभारणीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली खरी. परंतु, कंत्राटदाराने केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने हे काम बंद केले आहे. त्यामुळे मंजूर केलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवून तत्काळ या बसपोर्टचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
बेरोजगारांचे प्रस्ताव बँकेत धूळखात
परभणी : राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजारांच्या जवळपास लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र बँकांकडून केवळ २८७ युवकांचेच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांचे प्रस्ताव या ना त्या कारणामुळे बँकेत धूळ खात पडून आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज निमार्ण झाली आहे.
जिल्हा संकुलात सुविधांचा अभाव
परभणी : परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र या ठिकाणी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव आहे.भौतिक सुविधांची वाणवाही याठिकाणी दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.