शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रामगढ किल्यातील खूनाचा सुत्रधार अटकेत

By admin | Updated: November 3, 2014 15:09 IST

रामगढ किल्यात झालेल्या दुहेरी खून प्रकरणाने सबंध जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली होती.

 

माहूर : येथील रामगढ किल्यात झालेल्या दुहेरी खून प्रकरणाने सबंध जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली होती. मात्रमुख्य सुत्रधार रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर हा फरार होता. त्यास यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथून शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी शिताफीने अटक केली. रामगढ किल्यातील हत्ती दरवाजा ते बारुदखाना जाणार्‍या पायवाटेवर पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थीनी निलोफर बेग व शाहरुख खान फिरोजखान पठाण या दोघांचा मृतदेह १0 ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. शरीरावर कुर्‍हाड व चाकूचे वार करुन निघृण खून झाल्याची बाब तपासात पुढे आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. यातील गुंता वाढत गेल्याने अधिक तपासासाठी पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांनी तपासाची सुत्रे स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविली. खून प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. यापैकी राजू उर्फ राजा रघूनाथ गाडेकर, शेख जावेद पेंटर शेख हुसेन, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे या पाच जणांना अटक करण्यात आली. मात्र मुख्य सूत्रधार रघू रोकडा उर्फ डॉन रघू नाना पळसकर हा फरार होता. त्याची सासरवाडी यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथील असल्याने तो तेथे जाण्याची शक्यता बळावली.  पोलिस निरीक्षक डॉ. अरुण जगताप यांनी घाटंजी येथील ठाण्याशी संपर्क करुन आरोपीची फोटो पाठवून पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते. सहायक पोलिस निरीक्षक एल.डी. तावरे यांनी सदरील आरोपी पारवा येथे असल्याची माहिती माहूर पोलिसांना दिली.  आरोपीच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक जगताप यांच्या पथकातील सपोनि. जगदिश गिरी, रमेश गावंडे, पी.एम. गेडाम, बंडू जाधव, संतोष गडपवार, दत्ता पेंदोर, सपोनि अविनाश केरी, गुणवंत सलाम, स्वाधीन ढवळे, सय्यद सिराज, पांडूरंग गुरनुले, पारवा येथील सपोनि. तावरे, गणेश घोसे, गजानन नव्हाते, दशरथ कुमरे, मंगेश वळसकर, योगेश सलामे, राजू शेंडे यांनी शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास रघू रोकडाचे सासरे बाकाराम पाडाले याच्या घरातून ताब्यात घेतले.  खून प्रकरणी सुपारी देण्यामागे कोणाचा हात आहे? याचा तपास घेणे स्थानिक गुन्हा शाखेला सोयीचे होणार आहे. /(वार्ताहर)