राज्य शासनाच्या बहुजन विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने ७ जुलैपासून काळी पट्टी निषेध आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात १२ जुलै रोजी सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान गंगाखेड तहसील कार्यालयासमोर काळ्या पट्ट्या लावून धरणे व घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुधीर डाके यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असलेला शेती, शेतकरी, कामगार विरोधी काळे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, मराठा समाजास संविधानिक आरक्षण लागू करावे, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व स्तरावर मोफत शिक्षण घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आले. या निवेदनावर रमेश माने, सुदत्त मस्के, शिवाजी पवार, किशोर मस्के, बाळू चव्हाण, विठ्ठल कांबळे, मुंजाभाऊ लांडे, लक्ष्मण चव्हाण, नारायण घनवटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST