शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

परभणी जिल्ह्यातील ४० ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:18 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला असून या रस्त्यांचा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला असून या रस्त्यांचा एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास करण्यात येणार आहे.सोनपेठ तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग २५ ते नैकोटा, बोंदरगावरोड, इतर जिल्हा मार्ग २३ ते भुक्तरवाडी रोड, इतर जिल्हा मार्ग २३ ते पारदवाडी रस्ता, प्रस्तावित जिल्हा मार्ग १८ ते चुकार पिंपरी , राज्यमार्ग २२१ ते गवळी पिंपरी, पाथरी तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग ३८ ते डोंगरगाव रोड, राज्यमार्ग ६१ ते वरखेड रोड, राज्यमार्ग ६१ ते रेणापूर रोड, मानवत तालुक्यातील राज्यमार्ग २५३ ते सावंगी मगर रोड, राज्यमार्ग २५३ ते मंगरुळ रोड, परभणी तालुक्यातील राज्यमार्ग २४८ ते ताडपांगरी, राज्यमार्ग २२२ ते आलापूर पांढरी रोड, राज्यमार्ग २२२ ते राहटी रोड, राज्यमार्ग ६१ ते शिर्शी बु., प्रजिमा ३५ ते परळगव्हाण, राज्यमार्ग २२२ ते असोला, राज्यमार्ग ६१ ते शिर्शी खु., प्रजिमा ७ ते पिंपळगाव टोंग, जिंतूर तालुक्यातील इतर जिल्हामार्ग ३७ ते जांब खु. रोड, इतर जिल्हामार्ग ६ ते सोरजा रोड, राज्यमार्ग २४८ ते शेक रोड , प्रजिमा ०२ ते तेलंगवाडी, येसेगाव ते २४८ ते कडसावंगी ३० ते प्रजिमा रोड, प्रजिमा ०२ ते बेलुरा तांडा रोड, सेलू तालुक्यातील राज्यमार्ग २५३ ते प्रिंपुळा, राज्यमार्ग २५३ ते वाकी, गंगाखेड तालुक्यातील बडवणी ते कातकरवाडी प्रजिमा २१ ते ब्रह्मनाथवाडी रोड, इतर राज्यमार्ग १६ ते दत्तवाडी शंकरवाडी रोड, प्रजिमा २१ ते चिंचटाकळी, राज्यमार्ग २४८ ते धारासूर, पूर्णा तालुक्यातील राज्यमार्ग २३५ ते कळगाव, राज्यमार्ग १६ ते खांबेगाव, राज्यमार्ग २५ ते धनगर टाकळी, इतर जिल्हा मार्ग ८ ते रेगाव रोड, इतर जिल्हामार्ग ८ ते धोत्रा आणि पालम तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग १६ ते सायाळा उमरथडी रोड या ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे भविष्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून २०१९-२० या आर्थिक वर्षात होेणार आहेत. या संदर्भातील आदेश ११ जून रोजी ग्रामविकास विभागाने काढला आहे. मंजूर प्रत्येक रस्त्याच्या कामाला तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार असून त्यानंतर ई-टेंडरिंग करुन कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.६६ कोटीं रुपयांची अंदाजित रक्कम लागणार४जिल्ह्यातील ४० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यात आला असून या माध्यमातून ९६.१५ कि.मी.ची काम करण्यात येणार आहेत. त्यानुसार ६५ कोटी ९० लाख ८८ हजार रुपयांची अंदाजित रक्कम यासाठी लागणार आहे.४ या रस्त्यांची पाच वर्षे नियमित व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ३ कोटी ३६ लाख ५८ हजार रुपयांच्या रक्कमेची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे निधीचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लागला आहे. परिणामी या संदर्भातील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा