सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील आम्रवन महाविहार येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण अभ्यास केंद्राचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवानंद हाके,प्रशिक्षक सतीश जाधव ,महाविहारचे अध्यक्ष अशोक अंभोरे, शिवसेना उप तालुकाप्रमुख रामेश्वर बहिरट,आमोल सातपुते, राधाकिशन मोरे, पवन मोरे, प्रकाश लोखंडे, सुधाकर अवचार, अर्जुन शेजुळ,भारत ढाले, माणिक उंडे ,भागवत सातपुते, सुभाष वाघ, अरुण आवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस भरतीत आपली निवड होऊ शकत नाही. हा मनातील न्यूनगंड दूर करून टाकावा कारण मि सुध्दा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. स्पर्धा परीक्षेची माझी जिद्द होती. ती प्रबळ इच्छाशक्ती व परिश्रमाने मी जिवनात यशस्वी झालो.याप्रमाणे आपण सुध्दा ध्येयापर्यंत निश्चित पोहचू शकता असे पारधी म्हणाले. प्रास्ताविक संयोजक अशोक अंभोरे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव मोरे, किरण शेजुळ, सतीश मोरे, यशवंत पांचाळ, राजू राठोड, राजीव अंभोरे, अरुण आवचार, पो.पाटील भारत ढाले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिवानंद हाके यांनी तर आभार पवन कटारे यांनी मानले.
कठोर परिश्रम हेच यशाचे गमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST