शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणातील नागरिकांना मतदानासाठी अर्धा तास राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:42 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ...

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात २५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी २२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांमुळे विलगीकरणात गेलेल्या साधारणत: १०० ते १५० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक विभागाने या संदर्भाने मार्गदर्शन सूचनाही प्रसारित केल्या आहेत.

त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान संपण्यापूर्वीचा अर्धा तास विलगीकरणातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून विलगीकरणातील नागरिकांना मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्रांवर फिजिकल डिस्टन्स

जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान कर्मचारी आणि मतदान प्रतिनिधी यांची बैठक व्यवस्था फिजिकल डिस्टन्स राखून करण्यात येईल. मतदान एजंट किंवा मतमोजणी प्रतिनिधींचे तापमान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास मतदान केंद्र अधिकाऱ्याच्या परवानगीने त्यांच्याऐवजी राखीव एजंटांना काम सोपविण्याची मुभा देण्यात आली आहे.

मास्क करावा लागणार वर

मतदानासाठी आलेल्या मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी आवश्यकतेनुसार मास्क उतरवावा लागेल. ओळख पटल्यानंतर या मतदारांना पुन्हा मास्क घालता येईल. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया करता येणार आहे.

केंद्रात केवळ एकच मतदार राहाणार

कोरोनाच्या संदर्भाने फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांसमोर केवळ एकच मतदार उभा राहू शकतो. मतदार नोंदणीवर सही करण्यासाठी आणि मतदानासाठी इव्हीएमचे बटन दाबण्यासाठी मतदारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार आहे. हे सॅनिटायझर दर्शनी भागात ठेवले जाईल तसेच मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी फेसमास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड, ग्लोज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व ती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले साहित्यही उपलब्ध करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक