शहराची वाढलेली लोकसंख्या लक्षात घेवून मनपा प्रशासनाने नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिनी अंथरण्यात आली. त्यामुळे या जलवाहिनीवर नवीन नळजोडणी घेवून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले होते. मात्र, याचदरम्यान कोरोनाचे संकट निर्माण झाले. या संकटाचा सामना करताना नागरिकांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नवीन नळजोडण्या घेण्यासाठी मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जुने नळधारक आणि नवीन नळधारकांना पाणीपुरवठा करताना मनपा प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी नळजोडण्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु, जुन्या नळजोडण्याधारकांच्या अनामत रकमेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नवीन जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे.
नवीन नळजोडण्यांची शहरात वाढेना संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST