शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 19:18 IST

या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या तिजोरीत महसुलाची भर६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी : जिल्ह्यासाठी वरदान लाभलेल्या येलदरी येथील प्रकल्पातून ७ महिन्यांमध्ये ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली असून, याद्वारे राज्याच्या तिजोरीमध्ये १४ कोटी रुपयांच्या महसूलाची भर या सिंचन प्रकल्पाने घातली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाने परभणीसह हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमधील अनेक शहरे आणि गावांची तहान भागविली आहे. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्र सिचंनाखाली आले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे येथील वीज निर्मित प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आला. एप्रिल  महिन्यापासूनच प्रकल्पाची वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी हा प्रकल्प बंद होता; परंतु, १२ ऑगस्ट रोजी येलदरी धरण १००टक्के भरल्याने अतिरिक्त होणारे पाणी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडण्यात आले. लॉकडाऊन आणि कमी मनुष्यबळ असतानाही या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचे केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे. १ एप्रिल ते २२ ऑक्टोबर या ७ महिन्यांच्या काळात ४६.१४ दशलक्ष युनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करण्यात आली असून, राज्याच्या तिजोरीत १४ कोटी रुपयांची भर घातली आहे.

महानिर्मितीचे मुख्य अभियंता ए.एस. कुलकर्णी, नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.के. रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अखंडीतपणे हे केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची पदे रिक्तयेलदरी येथील जल विद्युत प्रकल्पाने राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा केला असला तरी या प्रकल्पाला कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची एकूण ५६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २५ कर्मचाऱ्यांवर हा प्रकल्प चालविला जात आहे. विशेष म्हणजे वीज निर्मिती केंद्राची उभारणी होवून ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी बसविलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. यंत्रणा जुनी झाल्यानंतर तिची क्रय शक्ती कमी होते. मात्र येथील वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेपेक्षा अधिक वीज निर्मिती करून वेगळेपण सिद्ध केले आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखालीयेलदरी प्रकल्पाला मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीचे सिंचन होणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील मोठ्या शहरासह २५० हून अधिक गावांना वर्षभर पाणी पुरवठा येथून होतो. 

टॅग्स :parabhaniपरभणीelectricityवीज