शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी तालुक्यातील पारव्यात २0 जणांना गॅस्ट्रो

By admin | Updated: November 11, 2014 15:46 IST

पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता दाखविली जात नाही.

पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता दाखविली जात नाही. परिणामी येथील रुग्ण परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन ग्रामस्थांवर उपचार करावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे. परभणी: तालुक्यातील पारवा येथे २0 ते २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. येथील काही रुग्ण खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.पारवा येथे मागील चार ते पाच दिवसांपासून उलटी, जुलाब होणार्‍या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परभणी येथे दाखल झाले आहेत. या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे. आरोग्य विभागाच्या वतीने १0नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांना भेटी देऊन उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दूषित पाणीपुरवठय़ामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले अशोक कन्हे, दौलत मुटकुळे, राजेश लोंढे, पद्ममीनबाई सोळंके, सुवर्णा सोळंके, अंगद मुटकुळे, शशिकला मुटकुळे, कोंडाबाई मुटकुळे यांच्यासह अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. गत चार ते पाच दिवसांपासून गावामध्ये उलटी- जुलाब होत असताना आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाली कशी नाही, याबाबतही ग्रामस्थ आरोग्य विभागाला जाब विचारत आहेत. (/प्रतिनिधी)