शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतातही होतो राष्ट्रभक्तीचा जागर

By admin | Updated: January 27, 2015 12:26 IST

राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्‍याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे.

परभणी : रितीरिवाजाने घालून दिलेले पारंपरिक सण खेडोपाडी उत्साहात साजरे होतात. त्याच जोडीला राष्ट्रभक्तीचा जागर करणारे राष्ट्रीय सणही तेवढय़ाच उत्साहाने साजरे करण्याचा उपक्रम तालुक्यातील एका महिला शेतकर्‍याने सात वर्षांपासून अखंडिपणे सुरू केला आहे. कुठलाही गाजावाजा न करता राष्ट्रभक्तीची ही उपासना इतरांसाठी निश्‍चितच आदर्शवत आहे. कुठलेही शिक्षण घेतले नसताना साक्षर बनलेल्या झाडगाव येथील सुशीलाबाईज्ञानोबाराव देशमुख या सात वर्षांपासून आपल्या शेतात राष्ट्रीय सणांच्या दिवसी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी हा नेम आजपर्यंत चुकलेला नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रभक्तीचे वातावरण या दिवशी तयार केले जाते. रांगोळी काढून शेतातील ध्वजस्तंभ सजविला जातो. शेजारील शेतकर्‍यांना बोलावून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा हा उपक्रम राबविला जातो. आज प्रजासत्ताक दिन असून, या दिवशीही झाडगाव येथील शेतात हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. सुशीलाबाई देशमुख यांची ही राष्ट्रभक्ती इतर महिला, ग्रामीण शेतकर्‍यांसाठी आदर्शठरणारी आहे.

 ■ सुशीलाबाई देशमुख यांचा मुलगा सुशील देशमुख हे क्रीडा शिक्षक असून, शाळेतील ध्वजारोहणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे राष्ट्रीय सणांच्या आधी चार-पाच दिवस घरी ध्वजारोहणाच्यानिमित्ताने वातावरण निर्मिती होते. ध्वज, ध्वजस्तंभ या बरोबरच इतर साहित्य घरी असते. यातूनच सुशिलाबाईंना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्वत:च्या शेतामध्ये ध्वजारोहणास सुरुवात केली.

■ शासकीय नियमानुसार शासकीय, निमशासकीय संस्थांबरोबरच प्रत्येकाला आपल्या घरी, खाजगी कार्यालयात ध्वजारोहण करता येते. परंतु, असे ध्वजारोहण करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. सुशीलाबाईंनी हा पायंडा पाडला आहे.