शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी स्मार्ट फोनचा हट्ट पुरवला नाही; युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:25 IST

या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

ठळक मुद्देअल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात.

देवगावफाटा : वडिल मोबाईल घेऊन देत नसल्याचा राग मनात धरुन एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना सेलू तालुक्यातील निरवाडी खु. तांडा येथील २७ एप्रिल घडली होती. या प्रकरणी वडिलांच्या जवाबानंतर ६ मे रोजी आत्महत्येचे कारण पुढे आले आहे.

निरवाडी खु. तांडा येथील कृष्णा गोविंदराव आडे (२०) या युवकाने २७ एप्रिल रोजी चिकलठाणा खु. येथील सखाराम टाके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. निरवाडी खु. तांडा येथील गोविंदराव आडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेत जमिनीवरच कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. 

मुलीचे लग्न करुन दिल्याने गोविंदराव आडे यांची आर्थिक अडचण सुरु होती. त्यांना शेतीकामात मदत करणारा मुलगा कृष्णा आडे याने आत्महत्या केल्यापासून तर या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ६ मे रोजी वालूर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव चौरे यांनी कृष्णा याच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबातील सदस्यांचे जवाब नोंदवून घेतले. यावेळी त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी सांगितले, अ‍ॅन्ड्रॉँईड मोबाईल घेऊन देण्याची मागणी कृष्णाने वारंवार केली होती. परिस्थितीमुळे त्याला मोबाईल घेऊन देणे शक्य नसल्याने थोडेसे थांबण्याची विनंती केली. मात्र कृष्णाचा हट्ट जीवावर बेतेल, असे वाटले नव्हते. मोबाईल न दिल्याचा राग मनात धरुन कृष्णाने आत्महत्येचा पर्याय निवडला, असा जवाब त्याचे वडिल गोविंदराव आडे यांनी पोलिसांना दिला आहे.आई- वडिल हे मुलांच्या सुखासाठी सर्वकाही करीत असतात. मात्र मुलांच्या मनाविरुद्ध पालकांनी वागू नये, असा आजचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे मुलांचे अनावश्यक हट्ट असतील तर पालकांनी याबाबत अगोदरच मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. जेणेकरुन  मुलाने हा हट्ट सोडून दिला पाहिजे.- साहेबराव चौरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 

टॅग्स :Suicideआत्महत्याMobileमोबाइलparabhaniपरभणी