शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 23, 2014 14:25 IST

अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

देवगावफाटा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन पिकाच्या उतार्‍यात घट झाली असून, एका बॅगचा खर्च ६ हजार रुपये तर उत्पन्न मात्र ३ हजार रुपये निघत असल्याने सोयाबीनने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणले असून, शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

देवगावसह चिकलठाणा मंडळामध्ये शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीन पीक घेण्यास पसंती दर्शविली होती. परंतु, सहा नक्षत्र कोरडेठाक गेल्याने शेतकरी हतबल झाला होता. मघा आणि पूर्वा नक्षत्रात पावसाच्या हजेरीने खरीप पिकास जीवदान मिळाले होते. खरिपाची सुगी करून बळीराजा दिवाळी दणदणीत साजरा करायचा. 
परंतु, यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले. परिणामी दिवाळी झगमगाटात साजरी होत असली तरी शेतकर्‍यांच्या हृदयात मात्र अंधकाराची हुडहुडी भरली आहे. सोयाबीनच्या एका बॅगचा बियाणाचा खर्च २ हजार ७00 रुपये, खतासाठी १ हजार रुपये, फवारणी व मजुरीसाठी ८00 रुपये तर काढणीसाठी १५00 रुपये असा ६ हजार रुपये खर्च आला असून, एका बॅगला उत्पन्न मात्र १00 किलो निघत आहे. 
सोयाबीनला प्रतिक्विंटल २९00 ते ३000 रुपये भाव मिळत असल्याने खर्च निघणे अवघडझाले आहे. एक प्रकारे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडल्याचे दिसते. काही शेतकर्‍यांनी कापूस व सोयाबीनचे पीक वाया जावू नये म्हणून सिंचनाची सोय केली. परंतु, भारनियमनामुळे त्यालाही फटका बसला. 
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे ज्वारी, हरभरा यांची पेर धोक्यात आली आहे. एकंदरीत शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर) 
■ खरिपाची पेर वाया गेली. तर रबीची पेरच धोक्यात आली. सोयाबीनची परिस्थिती पाहता अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या पिकात जनावरे सोडली. अशी विदारक परिस्थिती असतानाही अधिकारी मात्र सरकारला या संदर्भात अंधारात ठेवीत आहेत. महसूल विभागाने वस्तुनिष्ठ आणेवारी काढावी व शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी सूर्यकांत होणराव व नागनाथ साळेगावकर यांनी केली आहे. आर्थिक मदत जाहीर करावी
> खरिपाची पेरणी वाया गेल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखलघेऊन सोयाबीनच्याभावात वाढ करावी, व नुकसानीबद्दल आर्थिक मदत जाहीर करून बळीराजास दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी रमेश तांबे यांनी केली.