शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:22 IST

परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे कृषी, औद्योगिक, वाणिज्य, घरगुती या वर्गवारीतील जवळपास अडीच लाख वीज ग्राहक आहेत. या वीज ...

परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे कृषी, औद्योगिक, वाणिज्य, घरगुती या वर्गवारीतील जवळपास अडीच लाख वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना महावितरणकडून महिनाभर वीजपुरवठा केला जातो. त्यापोटी वीज बिल देण्यात येते. मात्र या बिलापासून मुक्तता मिळावी, यासाठी ग्रामीण भागात बहुसंख्य वीजग्राहक शेजाऱ्याकडून वीजपुरवठा घेतात. मात्र शेजाऱ्याकडून वीजपुरवठा घेणे हे अनधिकृत असून असा प्रकार आढळल्यास वीज ग्राहक व संबंधितावर वीज वितरण कंपनीच्यावतीने कारवाई केली जाईल. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपला वीज पुरवठा शेजाऱ्याला न देता अधिकृतपणे वीज जोडणी घेण्यासाठी संबंधितास प्रवृत्त करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीच्यावतीने शुक्रवारी करण्यात आले.

कायदा काय सांगतो ?

एखाद्या वीज ग्राहकाने शेजाऱ्याला अनधिकृतपणे वीज जोडणी दिल्यास, वीज वितरण कंपनीच्या २००३ मधील कायद्यानुसार १२६ कलमांतर्गत मीटरमध्ये छेडछाड करणे, अनधिकृत वीज जोडणी घेणे, शेजाऱ्याला वीज देणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधित वीज ग्राहक व इतरांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे महावितरणचा कायदा सांगतो.

चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे अडीच लाखहून अधिक वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे जवळपास तेराशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीला अनधिकृत वीजचोरी, वीजगळती यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्यावतीने अनधिकृत वीज चोरीला आळा घालण्यासाठी ‘चोरी कळवा दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.