सेलू: तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची सोमवारी निवडणूक होत असून, यात काही ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सेलू तालुक्यातील गिरगाव बुद्रूक, गुळखंड, पिंपरी गोंडगे, भांगापूर, राजा, गव्हा, कन्हेरवाडी, खैरी, चिकलठाणा बुद्रूक, नांदगाव, आहेर बोरगाव, आडगाव, गोमेवाकडी, पिंपरी खुर्द, गुळखंड, ढेंगळी पिंपळगाव, देऊळगाव गात, वालूर, खवणे पिंपरी, मोरेगाव, सोन्ना, डिग्रस बुद्रूक, खुर्द या २१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक होत असून, तालुक्यातील सर्वात मोठ्या वालूर ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या देऊळगाव, आहेर बोरगाव, मोरेगाव, चिकलठाणा बुद्रूक आदी ग्रामपंचायतीच्या निवडीवर नजरा लागल्या आहेत.
निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर, एस.बी. तोटेवाड, आर.आर. माने, एम. के. रोडगे, एस. आर. चिलगर, एस. एस. धायडे, एस. एस. राजूरकर, सुनील गोडघासे, एस. बी. अडकिने, अमर जोरगेवाड, केशव गजमल, जी. के. येल्हारे, टी. बी. इंगळे, डी. पी. कुपटेकर, डी. बी. कनकदंडे, नंदकुमार सोनवणे, पी. बी. राठोड, एस. बी. लोणीकर, व्ही. एन. मुखेडकर, शैलेंद्र गौतम व अमोल माटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.