शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आठ टनाने घटली प्राणवायूची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी ८ टनाने घटली आली असून, सध्या रुग्णांना दररोज १२ टन ऑक्सिजनची आवश्यकता ...

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी ८ टनाने घटली आली असून, सध्या रुग्णांना दररोज १२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे.

मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांना त्रस्त करीत आहे. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला मोठा त्रास सहन करावा लागला. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याच काळात जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली होती. एप्रिल महिन्यात जिल्ह्याला दररोज २० टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. याच काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन खाटांसाठी मोठी धावपळ झाली. दरम्यान, सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी २० टनावरून १२ टनांवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, आयटीआय कोविड हॉस्पिटल आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन खाटा उपलब्ध असून, या ठिकाणी आतापर्यंत सरासरी ३ के एल ऑक्सिजन दिवसाकाठी लागत होते. ही मागणी आता १.५ के एल वर आली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातही ऑक्सिजनची मागणी घटली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ऑक्सिजनच्या ४२६ खाटा रिक्त

कोरोना रुग्णांची संख्या वाढली तशी ऑक्सिजनची मागणीही वाढली होती. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने अतिदक्षता विभागात ६०८ आणि आयसीयुच्या बाहेर ४९७ ऑक्सिजन खाटांची निर्मिती केली. सुमारे ११०५ ऑक्सिजन खाटा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. सध्या आयसीयू आणि आयसीयू बाहेरील ऑक्सिजन खाटांवर ६२० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय व्हेंटिलेटरवर ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला ४२६ ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत.

ऑक्सिजन प्रकल्पाचा मोठा आधार

येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात हवेपासून ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात या प्रकल्पावरून ६० खाटांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जात आहे. एका रुग्णाला १० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजनचा पुरवठा या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे. प्रकल्प उभारल्याने ५० खाटांसाठी बाहेरून होणारा ऑक्सिजन पुरवठा आता बंद झाला आहे.