शासकीय कामकाजावर परिणाम
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयातील कर्मचारी ५० टक्केच ठेवण्याचे आदेश दिल्याने नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. येथील आरटीओ कार्यालयातही या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे.
नियमित स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष
परभणी : शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयासमोर रस्त्यालगत काही नागरिक कचरा आणून टाकत आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला असताना मनपाचे कर्मचारी हा कचरा उचलत नाहीत. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
पूर्णा : तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे रहदारी ठप्प होते. याकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.
मानवत रोड रस्ता कामाला येईना वेग
मानवत : मानवत रोड ते परभणी या रस्त्याच्या कामाला संबंधित कंत्राटदाराकडून वेग देण्यात येत नाही. गेल्या वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहेत.
उमरीमार्गे वाहतूक वाढली
परभणी : परभणी ते मानवत रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारक माजलगावच्या दिशेने जाण्यासाठी उमरी मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक वाढल्याचे पहावयास मिळत आहे.