शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Parabhani : संचारबंदी नियम मोडून मध्यरात्री कापड विक्री; दुकानदाराला दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:32 IST

Coronavirus in Parabhani : काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या दोन-तीन दिवसांपासून घडत आहे.

परभणी : संचारबंदीचे नियम मोडून मध्यरात्री दुकानाचे शटर बंद ठेवून कापड विक्री करणाऱ्या येथील एका व्यावसायिकाला १० हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. असे असताना काही व्यापारी मात्र बंद दाराआड व्यवसाय करीत असल्याचा प्रकार मागच्या दोन-तीन दिवसांपासून घडत आहे. ४ मे रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास शिवाजी चौक ते नानलपेठ या रस्त्यावरील एका कापड दुकानात शटर बंद करून कापड विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. तेव्हा शंभरपेक्षा अधिक ग्राहक दुकानांमध्ये आढळले. ‘इम्प्रेशन’ नावाने सुरू असलेल्या या दुकान व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

वसमत रस्त्यावर कारवाईशहरातील वसमतरोड भागातील ‘रंगवर्षा’ नावाचे दुकान ५ मे रोजी सकाळच्या सुमारास सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी या दुकानावर जाऊन कारवाई केली आहे. दुकानदाराकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच याच भागात शगुन नावाचा दुकानात शटर बंद करून व्यवसाय सुरू होता. या व्यावसायिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश डॉ.कुंडेटकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणी