शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने १४ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हावासीयांची धास्ती दररोज वाढू लागली आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्हावासीयांची धास्ती दररोज वाढू लागली आहे. १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ६८४ नव्या रुग्णांची नोंद झाली.

मागील एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य यंत्रणा रुग्णांना बरे करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. मात्र, रुग्णांची संख्या त्याच पटीने वाढत आहे. विशेष म्हणजे, नवीन रुग्णांच्या नोंदीबरोबरच कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १२ आणि खाजगी रुग्णालयातील २ अशा १४ रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाला शनिवारी २ हजार ७१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार २०७ अहवालांमध्ये ४१६ आणि रॅपिड अँटिजन टेस्टच्या ८६४ अहवालांमध्ये २६८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २० हजार १८५ झाली असून, त्यापैकी १५ हजार १६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ५०९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ४ हजार १४ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात ६७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६५, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२६, अक्षदा मंगल कार्यालय १४० रुग्ण उपचार घेत आहेत, तर होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ४४४ एवढी आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांची वाढली संख्या

जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आठवडाभरापूर्वी शंभर ते दीडशे रुग्ण दररोज कोरोनामुक्त होत होते. ही संख्या आता ३०० पार झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.