शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांअभावी आठ प्राथमिक केंद्रातील रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST

परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत ३७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी केवळ ३२ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून, त्यातील दोन ...

परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत ३७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी केवळ ३२ आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका असून, त्यातील दोन केंद्रांकडे भाड्याच्या रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८ केंद्रांतील रुग्णांचे रुग्णवाहिकेअभावी हाल होत आहेत.

परभणी जिल्ह्यातील रुग्णांना आपल्या गाव परिसरात उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. त्यात कोरोनाच्या काळात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे सध्या ३७ केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येतात. मात्र, या केंद्रांमधून गंभीर व अत्यावश्यक रुग्णांना उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालय वा खासगी रुग्णालयात रेफर केले असता, रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालय गाठताना खिळखिळ्या व नादुरुस्त रुग्णवावाहिकेतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

३७ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित

परभणी जिल्ह्यात ३७ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित असून, यातील २९ केंद्रांकडे स्वत:ची रुग्णवाहिका आहे. मात्र, सेलू तालुक्यातील देऊळगाव व वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भाड्याच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन या केंद्रांना स्वत:च्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

दररोज ५० रुग्णांना केले जाते रेफर

जिल्ह्यातील ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून दिवसभरात जवळपास ५० गंभीर रुग्णांना अत्यावश्यक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालयाकडे रेफर केले जाते. त्यामुळे अद्ययावत रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

सहा केंद्रांना रुग्णवाहिकाच नाहीत

जिल्ह्यात नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या शेळगाव, बनवस, आर्वी, एरंडेश्वर, चारठाणा व मरडसगाव या केंद्रांना रुग्णवाहिकांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या केंद्रातील रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जाताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

रुग्णवाहिकेच्या विम्याकडे दुर्लक्ष

प्राथमिक आरोग्य केंद्रातून इतर रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना रुग्णवाहिका रस्त्याने सुसाट वेगाने नेल्या जातात. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा विमा असणे गरजेचे असताना, बहुतांश रुग्णवाहिकांचा विमा नसल्याचे समजते.

नादुरुस्त रुग्णवाहिकांचा वैताग

आरोग्य विभागाकडून ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे रुग्णवाहिका असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी बहुतांश रुग्णवाहिका ह्या अनेकदा नादुरुस्त असतात. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे शासकीय रुग्णवाहिका आहेत. वालूर व देऊळगाव गात या दोन केंद्रांना भाड्याच्या रुग्णवाहिका आहेत. उर्वरित सहा नवीन प्राथमिक केंद्रांसाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे रुग्णवाहिकांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. शंकरराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी