शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांना मिळतेय शहरवासियांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ ...

परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मागील वर्षी येलदरी येथून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र, ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फारसा फरक नाही. येलदरी जलाशयात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र ८ ते ११ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. शहरातील विविध भागांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले आहेत. नवीन व्हॉल्व्ह टाकले आहेत. परंतु, तरीही पाण्याचे नियोजन होत नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

कारेगाव रोड भागात १० दिवसानंतर शहरवासियांना पाणीपुरवठा झाला. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये ८ दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून खासगी बोअर आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागते. परंतु, हे पाणी आठ दिवस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी वितरणाचे नियोजन करून शहरवासियांना किमान ४ दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

पाणी वितरणासाठी खासगी कंत्राट

शहरातील नागरिकांना पाण्याचे वितरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. या एजन्सीने शहरातील व्हॉल्व्हची देखभाल करणे, पाण्याचे वितरण करणे आदी कामे करावयाची आहेत. त्याचप्रमाणे येलदरी ते धर्मापुरी या अंतरातील व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठीही एक एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. खासगी एजन्सीची नियुक्ती केल्यानंतरही शहराला मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

जलकुंभ उभारल्यानंतरही परिस्थिती जैसे थे

येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्यामुळे ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरील पाणी वितरणाचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाल्याने ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरून या भागातील वसाहतींना ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जलकुंभाची उभारणी झाल्यानंतरही या भागातील पाणी वितरणाची परिस्थिती जैसे थे आहे.