पिकांच्या अन्नद्रव्यांसाठी केवळ रासायनिक खतांवरच अवलंबून न राहता, जमिनीत जास्तीतजास्त सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, नाडेप खत, बायोडायनामिक कंपोस्ट हिरवळीचे खत वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जमिनीच्या भौतिक व जैविक गुणधर्मात सुधारणा होते. यासाठी सोनपेठ तालुक्यात रासायनिक खत बचत विशेष मोहीम खरीप हंगाम २०२१ मध्ये राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये एकूण रासायनिक खत वापराच्या १० टक्के खत बचतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या अनुषंगाने खत बचतीच्या या विशेष मोहिमेसाठी गावपातळीवर विविध कार्यवाहीचे ३ टप्पे आहेत. ग्रामपंचायतस्तरावर जमीन सुपिकता निर्देशांक फलक प्रदर्शित करून, त्याविषयी जाणीव जागृती करणे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्यपत्रिका वाटप करणे, तसेच सायकलच्या माहितीच्या आधारे गावनिहाय जमीन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आलेले आहेत. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
सोनपेठ येथे रासायनिक खत बचतीची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST