शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात मृत्यूसह जन्मदारही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर ...

शहरासह जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. हे प्रमाण सुरवातीला तीन महिने कमी होते. त्यानंतर आतापर्यंत रुग्णसंख्येची वाढ कायम आहे. सध्या मागील दीड महिन्यापासून लाँकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे विवाह तसेच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असल्याने मंगल कार्यालय किंवा रजिस्टर्ड पध्दतीने होणाऱ्या विवाहावर बंधने आली आहेत. पर्यायाने अनेक जण अगदी मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकून घेत आहेत. यामुळे नोंदणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्यक्षात विवाह सोहळे सुरुच आहेत. त्याचप्रमाणे शहरी भागात कोरोनाने होणारे मृत्यू वाढले आहेत. कोरोनाच्या कालावधीसह २०२० जानेवारी ते एप्रिल २०२१ पर्यंत १२,०८८ बालकांचा जन्म झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

वर्ष जन्म मृत्यू विवाह नोंदणी

२०२० ९४७८ २१४५ ४७८

२०२१ २६१० ७६९ १२४

लग्नांची संख्याही घटली

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लग्नांची संख्या घटल्याचे पहावयास मिळते. यंदाची आणि मागील वर्षीच्या तुळशीच्या लग्नानंतर होणारे अनेक विवाह सोहळे रद्द झाले आहेत. सतत लागणारे लाँकडाऊन आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचे निर्बंध पाहता ही संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यात नोंदणीकृत ३५ मंगल कार्यालय

शहरासह जिल्ह्यात नोंदणीकृत मंगल कार्यालय ३५ आहेत. या ठिकाणी एका मंगल कार्यालयात लग्न तिथीच्या काळात किमान ८ ते १० लग्न होतात. तर रजिस्टर्ड पध्दतीने महिन्याला ३० ते ४० विवाह होतात. या ठिकाणच्या लग्न कार्यात मोठी घट झाली आहे. यामुळे विवाह नोंदणी घटली आहे. मात्र, जन्मदर वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

चार महिन्यात २६१० जन्म

महापालिकेच्या जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनूसार जानेवारी ते एप्रिल २०२१ मध्ये २६१० बालकांचा जन्म झाला तर ७६९ जणांचा मृत्यू झाला. यात काही मृत्यू नैसर्गिक आणि बाकीचे कोरोनामुळे झाले आहेत. तसेच केवळ १२४ जणांनी विवाह नोंदणी केली आहे.